Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत पावसामुळे दाणादाण, मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत

मुंबई | मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. तसंच मुंबईच्या मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गांवरही पाणी साठलं आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. अशातच मुंबईत सहा तासांमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

मध्य रेल्वेनेही मुसळधार पावसाचा परिणाम लोकल सेवेवर झाल्याचं स्पष्ट केलं आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसहून डाऊन मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या लोकल तसंच एक्स्प्रेस गाड्या आणि एलटीटीहून सुटणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन्सही उशिराने धावत आहेत. यासंदर्भातली पोस्ट केली आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर यांना पावसाचा फटका बसला आहे. ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांना आज ऑफिस गाठताना हाल सहन करावे लागणार हेच पावसाची स्थिती सांगते आहे.

हेही वाचा    –      प्रवास ४० मिनिटांचा; विमानतळाबाहेर यायला दोन तास

या ट्रेन्स करण्यात आल्या रद्द

पुणे सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
पुणे सीएसएमटी डेक्कन क्वीन
पुणे सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई महापालिकेचं महत्त्वाचं आवाहन

मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button