TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आज ‘हाय होल्टेज पॉलिटिकल डे’’

High Voltage Political Day' today in Pimpri-Chinchwad

  • मुख्यमंत्री- विरोधी पक्षनेते एकाच दिवशी शहरात दाखल, प्रशासनाची धावपळ
  • एकनाथ शिंदे आमदार लांडगेंच्या भेटीला अन् अजित पवार महापालिकेतील बैठकीला

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडकरांचा शनिवारचा दिवस ‘हाय होल्टेज पॉलिटिकल डे’ ठरला. राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते एकाच दिवशी शहराच्या दौऱ्यावर आल्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. तसेच, राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली पहायला मिळाली.

सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ‘संवाद सोसायटीधारकांशी’ असा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्ताने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मैदानात उतरवण्यात आले होते. त्यानंतर आज अजित पवार यांनी महापालिकेत अचानक भेट दिली. यावेळी प्रशासक आणि आयुक्त शेखर सिंह यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तसेच, सोसायटीधारकांच्या समस्यांचा प्रस्ताव सादर करुन प्रश्न मार्गी लावण्याबाबत मागणी करण्यात आली.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. आमदार लांडगे यांना दि. २४ सप्टेंबर रोजी मातृशोक झाला. त्यानिमित्त सांत्वन करण्यासाठी शिंदे भोसरीत दाखल झाले होते. नाशिक येथील बस अपघातानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जखमी नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते.

सोसायटीधारकांच्या समस्यांवरून भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पेटला होता. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ शिंदे यांनी सोसायटीधारकांचा पुळका राष्ट्रवादीला राजकीय हेतूने आला असून, २० वर्षे सत्तेत असताना समाविष्ट गावांसह सोसायटीधारकांकडे राष्ट्रवादीने दुर्लक्ष केले, असा आरोप केला होता. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते विनायक रणसुंबे यांनी भाजपाच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात सोसायटीधारकांचे प्रश्न सुटले नाहीत. एकनाथ पवार यांचे सोसायटीधारकांसाठी योगदान काय? असा प्रतिहल्ला केला होता.


आमदार लांडगे यांचा राजकीय परीघ वाढतोय…
भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना मातृशोकानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी शोकसंदेश दिला आणि सांत्वन केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार, खासदार यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. नगरसेवक, स्थायी समिती सभापती, आमदार आणि भाजपा शहराध्यक्ष असा यशस्वी राजकीय प्रवास करणारे आमदार महेश लांडगे यांचा राजकीय परीघ आता वाढलेला दिसत आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button