लोकमत वृत्त समूहातर्फे सन्मान
पिंपरी | प्रतिनिधी
बोपखेलचे चित्र बदलण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. याच कामाची दखल घेत लोकमत वृत्त समूहातर्फे सन्मान करण्यात आला. या पुरस्काराने जबाबदारी वाढली असून, आता असेच काम पुढे चालू ठेवण्यासाठी आणखी बळ मिळाले आहे,’ असे प्रतिपादन माजी शिक्षण समिती सभापती चेतन घुले यांनी केले.
लोकमत समुहाच्या तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रतिभावंत व्यक्तींना लोकमत अचिव्हर्स या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येते. या गुणगौरव सोहळा कार्यकर्ते घुले यांना गौरविण्यात आले. पुणे येथिल जे. डब्ल्यू. मॅरिएट येथे (दि. 26) आयोजित सोहळ्यात सिने अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी चेतन घुले म्हणाले, बोपखेल गावासाठी चेतन घुले अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय कामांमध्ये गुंतलेले आहे. माजी उपमहापौर हिरानाणी घुले यांच्या माध्यमातून गावांमध्ये दवाखाना, पाण्याची टाकी, लष्कर भागातून जाणारा पूल अशी महत्त्वाची कामे पूर्ण केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय कामांमधून घुले कुटुंबीय अगदी मनापासून गावासाठी काम करत आलेले आहेत. याच कामाची दखल घेऊन लोकमत समूहातर्फे पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारातून खरेतर कामाप्रती जबाबदारी वाढली आहे असे चेतन घुले यांनी नमूद केले.
चेतन घुले म्हणाले की, महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तसंस्था लोकमततर्फे, कोविड काळात मी केलेल्या समाजकार्याबद्दल मला ‘लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड २०२२‘ या पुरस्काराने गौरविण्यात आले. सकारात्मक आणि प्रेरणादायी भावी पिढ्यांच्या निर्मितीसाठी तसेच समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ‘लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड्स‘ पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल लोकमत समूहाच्या सर्व पर्यवेक्षकांचे आणि संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो, असेही घुले म्हणाले.
