breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बंदी असतानाही फिरायला जाणं पडलं महागात; लोणावळ्यात 900 पर्यटकांकडून ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

मुंबई – पावसाळा सुरु झाला की मुंबई, पुण्यातील अनेक पर्यटक लोणावळा फिरण्यास येतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. असं असताना सुद्धा अनेक लोक फिरण्यासाठी बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. कोरोना नियमांचं पालन न करता बंदी असताना देखील फिरायला येणाऱ्या पर्यटकांवर शासनाने दिलेल्या नियमांप्रमाणे मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.

बंदी असताना देखील शनिवार व रविवार रोजी लोणावळ्याला फिरायला आलेल्या एकूण 900 पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. लोकांकडून 900 लोकांकडून 4. 28 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पर्यटक बंदी असताना सुद्धा पर्यटक येत असल्यामुळे लोणावळा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button