breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘वेळ बदलते, अधिकाऱ्यांना सांगतो… कुणाला सोडणार नाही’; उद्धव ठाकरे

राजापूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांवरही जोरदार हल्ला चढवला आहे. राजन साळवींच्या विरोधात कोणी तक्रार केली? काय मिळालं तुम्हाला? सत्ता येते आणि जाते. अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो, वेळ बदलते. कोणाला सोडणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच राजन साळवींच्या विरोधात जो उमेदवार आहे, तो जे पैसे वाटतोय त्याची चौकशी करा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे आज राजापुरात आहे. राजपूरमध्ये एका सभेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. आज मुद्दाम राजापूरात आलोय. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. बाजूलाचा पवित्र दर्गा आहे. जो कोणी देशाला आपलं मानतो, देशासाठी मरायला तयार आहे. लढायला तयार आहे हे आमचं हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – मिशन-२०२४ : पिंपरी-चिचवडमध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी पदाधिकारी मेळावा!

यावेळी उद्धव ठाकरे यांनी एसीबीने साळवी यांच्या घरातील संपत्तीची किंमत केलेली यादी वाचून दाखवली. या यादीवर सावंत नावाच्या व्यक्तीची सही आहे. राजन साळवींना धन्यवाद द्यायला आलो आहे. सुशांत चव्हाण तुम्ही महाराजांच्या मूर्तीची किंमत केली आहे. किती तर पाच हजार रुपये. बाळासाहेबांचा फोटो आणि खुर्ची याची किंमत दहा हजार रुपये. माझ्या वडिलांची किंमत मिंध्याना कळली पण तुम्हाला नाही कळली. सर्वांचे दिवस फिरतात हे लक्षात ठेवा आता त्यांचे दिवस आहेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्याची किंमत करता येणार नाही. तुमच्या आई वडिलांची किंमत केली तर तुमची किंमत किती? मिंध्याना त्यांच्या वडिलांची किंमत कळाली नाही म्हणून माझा बाप चोरताहेत, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी धूत पापेश्वर मंदिरात सपत्नीक दर्शन घेतलं. पुन्हा ठाकरे राज येऊ दे, असं साकडं यावेळी पापेश्वर देवाला घालण्यात आलं. पुन्हा शिवसेना ऊबाठाची सत्ता येऊ देत, असं गाऱ्हाणंही घालण्यात आलं. मंदिराच्या परिसरात नव निर्माण सुरू आहे. त्या कामाची उद्धव ठाकरे पाहणी करणार आहे. आमदार राजन साळवी यांच्या फंडातून मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button