breaking-newsराष्ट्रिय

TIKTOK व्हिडिओ बनवताय सावधान; नाहीतर होवू शकते कारवाई

मुंबई : TikTok प्रेमींसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही TikTokवर व्हिडिओ साकारत असाल तर तुम्हाला काही गोष्टींटी काळजी घेणं बंधणकारक असणार आहे. TikTok व्हिडिओ साकारताना तुमच्याकडून काही चूका झाल्यास तर त्या तुम्हाला महागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई देखील होवू शकते आणि तुमचं अकाऊंड सस्पेंड देखील करण्यात येवू शकेल. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपून TikTokवर भयानक व्हिडिओ साकारण्यात येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कपंनीने TikTok प्रेमींसाठी काही अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. किंबहूना युझर्सने हे नियम पाळले नाहीत तर त्यांच्यावर करवाई करण्यात येईल असं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 

TikTok ने युझर्सला  व्हिडिओ साकारताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी हे देखील सांगितले आहे. व्हिडिओ साकारताना कोणत्याही प्रकारच्या अपशब्दा चा वापर न करण्याची सूचना TikTokकडून देण्यात आली आहे. 

नुकताच, अपराधाला  प्रोत्साहन देणारे व्हिडिओ तयार केलेल्या युझर्सवर TikTokने करवाई देखील केली आहे. शिवाय त्यांच्यावर पोलीस स्थानकांत गुन्हा देखील नोंदवला गेल्याचं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे. 

TikTokने जारी केलेल्या अटी आणि शर्तींनुसार, बेकायदेशीर आणि  शारीरिक हिंसा, शारीरिक छळ करण्याला प्रोत्साहन देणे, कोणत्याही विशिष्ट समुदायाचा अपमान करने, लिंग भेद केल्यास, कोणाचीही वैयक्तीक माहीती TikTokच्या माध्यमातून प्रदर्शित न करने, असे केल्यास कंपनी कडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं देखील सांगण्यात आले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button