breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

म्युकरमायकोसिसमुळे मुंबईत तीन मुलांनी गमावले डोळे

मुंबई – कोरोना प्रादुर्भावाच्या महासाथीमध्ये आता म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीची लागण झालेले रुग्णही वाढू लागले आहेत. या आजाराची शेकडो लोकांना लागण होत आहे. त्यामुळे काहींना डोळे तर काहींना नाक गमवावं लागलं आहे. मुंबईत तर म्युकरमायकोसिसमुळे तीन बालकांना डोळे गमवावे लागले आहेत. तर एका मुलीला डायबेटिसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. डोळे गमावलेले तिन्ही मुले 4, 6 आणि 14 वर्षाचे आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 आणि 6 वर्षाच्या मुलांमध्ये डायबेटिसची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र 14 वर्षावरील मुलाला डायबेटिसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याशिवाय एक 16 वर्षाची मुलगीही आहे. तिलाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर तिला डायबेटिस झाला. तिच्या पोटात ब्लॅक फंगस आढळून आला होता. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार या मुलीचे डोळे काढण्यात आले. त्यानंतर सहा आठवडे तिची देखभाल करण्यात आली. सुदैवाने तिच्या डोक्यापर्यंत इन्फेक्शन पोहोचले नाही. मात्र, तिला डोळे गमवावे लागले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button