पिंपरी / चिंचवड

तळेगाव एमआयडीसी, निगडी, पिंपरी परिसरात तीन अपघात ; तिघांचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

तळेगाव एमआयडीसी, निगडी आणि पिंपरी परिसरात अपघाताच्या तीन घटना घडल्या. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी (दि. १८) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात संदीप सीताराम गारगोटे (वय ४०, रा. इंदोरी, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ सुधाकर सीताराम गारगोटे (वय ३०) हे दुचाकीवरून इंदोरी येथून जात असताना एम एच १४ / सी टी २३४७ क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने साहेबराव गायकवाड यांचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

निगडी पोलीस ठाण्यात आतिष विठ्ठल गायकवाड (वय ३०, रा. किवळेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे चुलते साहेबराव हनुमंत गायकवाड (वय ५१)हे रस्त्याने पायी चालत जात असताना भक्ती शक्ती चौकाकडून अंकुश चौकाकडे जात असताना अज्ञात वाहन चालकाने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने फिर्यादी यांच्या चुलत्याचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

वर्षा रमेश खरात (वय ४१, रा. संत तुकाराम  नगर,पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची आत्या अहिल्याबाई शिंदे आणि अन्य महिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन करण्यासाठी रिक्षातून जात होत्या. डी वाया पाटील इंजिनिअरिंग कॉलेज रोडवर एच ए पेट्रोल पंप येथे चंदर नंदलाल ललवाणी (वय ६२, रा. पिंपरी) या व्यक्तीने त्याच्या ताब्यातील कारने रिक्षाला समोरून जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी यांच्या आत्याचा मृत्यू झाला. अन्य महिला आणि रिक्षा चालक जखमी झाले आहेत. तसेच रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button