breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

लग्न जमत नसल्यामुळे शरद पवारांना ठार मारण्याची दिली धमकी!

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सागर बर्वे (३४) याला पुण्यातून अटक करण्यात आलं होतं. दरम्यान, सागर बर्वेने दिलेल्या धमकी प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. केवळ लग्न जमत नसल्यामुळे एका तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी पवारांना देण्यात आली होती.

‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरून आणि नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती. विशेष म्हणजे सागर बर्वे हा कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसल्याचे समजते. सागर बर्वे हा तरुण अविवाहित असल्याचे समजते. काही केल्या त्याचे लग्न जमत नव्हते. त्यात महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या फोटोवरून वाद निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगत गेल्या. या साऱ्याचा राग येऊन त्याने ही धमकीची पोस्ट लिहिली. याशिवाय यामागे आपला कोणताही हेतू नसल्याची माहिती सागरने पोलिसांना दिल्याचे समजते.

हेही वाचा – मल्लखांब आणि दांडपट्ट्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी परदेशी पाहुणे रोमांचित

पवारांना धमकी दिल्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होत होते. धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून ‘तुमचा देखील दाभोलकर करू’ अशी धमकी मिळाली होती. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button