TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

नवरात्र उत्सवात महालक्ष्मी मंदिर परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने या वर्षी देवस्थान समितीने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने संपूर्ण उत्सवाचे चित्रीकरण

कोल्हापूर : नवरात्र उत्सवात महालक्ष्मी मंदिर परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने या वर्षी देवस्थान समितीने ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने संपूर्ण उत्सवाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. याद्वारे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही वापर करण्यात येणार आहे. या ड्रोन कॅमेऱ्याचे शनिवारी अनावरण करण्यात आले.

नवरात्रीमध्ये कोल्हापूर तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांचा आधार घेण्यात येत आहे. देवस्थानच्या  सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे कर्मचारी राहुल जगताप, अभिजित पाटील यांनी यासाठी प्रशिक्षण घेतले आहे. ड्रोन अनावरणप्रसंगी देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, जुना राजवाडा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, राजेंद्र कांबळे, प्रशांत गवळी व देवस्थान कर्मचारी उपस्थित होते.

चोरीच्या घटनांना आळा..

आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. अनिकेत बागल, अभिषेक बागल, अवधूत चौगुले, सागर खेडकर हे कर्मचारी गेली पाच वर्षे सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात काम करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरीच्या अनेक घटनांची उकल करण्यात आली.

अतिरिक्त कॅमेरे..

मंदिराच्या बाहेरील ५०० मीटर परिघामध्ये मध्ये ‘७० आयपी’ स्वरूपाचे अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महालक्ष्मी मंदिर व मंदिरबाहेरील आवारामध्ये एकूण २०० सीसीटीव्ही कॅमेरे यांची नजर राहणार आहे. त्याचे नियंत्रण पोलीस मंडप, देवस्थान नियंत्रण कक्ष व राजवाडा पोलीस ठाणे येथे असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button