breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pune : यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुक दुपारी ४ वाजता सहभागी होणार

पुणे : सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे. प्रत्येक मानाच्या गणपतीच्या सजावटीला किंवा देखावा उभारण्यासाठी सुरूवात झाली आहे. दरम्यान, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती विसर्जन मिरवणुक दुपारी ४ वाजता सहभागी होणार आहे. याबाबतची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलीस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागील वर्षी सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दोन मुख्य अभियंता पदनिर्मिती!

भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले. म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल, असं ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावर्षी दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टकडून गणेशोत्सव काळात अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रकृती उभारण्यात येणार आहे. सध्या या मंदिराचे काम सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button