Views:
226
नवी दिल्ली |
पंजाबी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी अमृतसर येथून करतारपूरला जात असताना हा अपघात झाला आहे. जंडियाला गुरुजवळ ही दुर्घटना घडली. दिलजानचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिलजानच्या निधनानंतर पंजाबी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी पहाटे ३च्या सुमारास अमृतसर-जालंधर जोटी रोडवर जंडियाला गुरू पुलाजवळ दिलजानचा अपघात झाला. त्याची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. घटनास्थळी पोलीस पोहोचताच त्यांनी दिलजानचा मृतदेह ताब्यात घेतला. दिलजानचा अपघात कसा झाला? त्याची गाडी दुभाजकाला कशी धडकली? याचा तपास पोलीस करत आहेत. गायक सुकशिंदर शिंदा यांनी दिलजानचे निधन झाल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. ‘आज सकाळी अतिशय दु:खद बातमी मला कळाली. संगीत क्षेत्राला मोठे नुकसान झाले आहे. दिलजानचे निधन झाले’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.
दिलजानने आजवर अनेक गाणी गायिली आहेत. त्याचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. त्याने आधा पिंड, यारां दी गल, शूं करके, हर पल, फर्स्ट लव, मेरा दिल, धरती, तेरे शहर ही गाणी गायिली आहेत. लवकरच त्याचे एक नवे गाणे रिलीज होणार होते. या गाण्याचे नाव ‘तेरे वरगे २’ असे आहे. गाण्याबाबत दिलजान अतिशय उत्सुक होता. २ एप्रिल रोजी त्याचे हे गाणे रिलीज होणार होते. पण ते रिलीज होण्यापूर्वी दिलजानचे निधन झाले. २०१२मध्ये दिलजान टीव्ही रिअॅलिटी शो ‘सुरक्षेत्र’चा रनअप ठरला होता. तसेच त्याने ‘पिंड दी’ या कार्यक्रमात सहाभाग घेतला होता. या शोमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. त्याची गाणी कायमच चर्चेत होती.
वाचा- धक्कादायक!! ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत बलात्काऱ्यासोबतच दोरीने बांधून काढली पीडितेची धिंड
Like this:
Like Loading...