ताज्या घडामोडीपुणे

देवीचे दागिने चोरणारा चोरटा जेरबंद

पुणे | बोलाई माता मंदिरातील देवीच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्हीत ही चोरी कैद झाली होती. अनिल हौशिलाल चव्हाण (वय 31, रा. वडजाई, वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.जुनी जिल्हा परिषद परिसरात बोलाई माता मंदिर आहे. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांने मंदिरात घुसून चांदीचे दागिने चोरले होते. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. समर्थ पोलीस चोरट्याचा माग काढत होते. चोरटा चोरलेल्या साहित्यासह पुणे स्टेशन परिसरात फिरताना दिसून आला.

पोलिसांनी शोध सुरू केला. आसपासच्या नागरिकांना त्याचे छायाचित्र व चोरीचे सीसीटीव्ही दाखविले. यादरम्यान, मंगळवार पेठेतील बारणे रोडवर गस्त घालत असताना तो दिसून आला. त्याला तात्काळ पकडण्यात आले. त्याने मंदिरात चोरी केल्याचे कबूल केले आहे. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप जोरे करीत आहेत. वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button