TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पनवेल महापालिकेत समाविष्ट क्षेत्रातील रखडलेली कामे मार्गी लागतील : पार्थ पवार

पनवेल | प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको हद्दीतील काही भागाचा समावेश करण्यात आला आहे. त्या क्षेत्रातील सेवा आणि सुविधा सिडकोने पालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पनवेल महापालिकेत समाविष्ट क्षेत्रातील रखडलेली कामे मार्गी लागतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी व्यक्त केला.पनवेल महापालिका क्षेत्रात सामाविष्ट झालेल्या क्षेत्रातील सेवा आणि सुविधा सिडकोनं तातडीनं पालिकेकडे हस्तांतरित कराव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या. तसेच महापालिकेच्या विकास कामाकरिता आवश्यक ती मदत केली जाईल, असं आश्वासन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

याबाबत पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, सध्या पनवेलमधील नागरिकांना प्राथमिक सोयी सुविधांसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिका क्षेत्रात सामाविष्ट झालेल्या क्षेत्रातील सेवा आणि सुविधा सिडकोनं पालिकेकडे हस्तांतरित केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच निधी उपलब्धतेमुळे रखडलेली कामे मार्गी लागतील, असा विश्वास देखील पार्थ पवार यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button