breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर

पुणे : लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्‍न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पाच वर्षांतून एकदाच हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा त्यांना पुरस्काराने सन्मानित केले होते.

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि इ-मॅगॅझीनतर्फे दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. १७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान केला जाईल. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना पुरस्कार देण्यात येतो.

हेही वाचा  –  ‘जितेंद्र आव्हाड भांबावले आहेत, ते पागलासारखे..’; काँग्रेस नेत्याची खोचक टीका

खासदार श्रीरंग बारणे यांनी ६०५ प्रश्‍न विचारले आहेत. १५९ चर्चांमध्ये सहभाग घेतला असून, १३ खासगी विधेयके मांडली आहेत. त्यांची सभागृहात ९४ टक्के उपस्थिती आहे. याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार सलग सात वेळा, संसद विशिष्टरत्न पुरस्कार एकवेळा मिळाला आहे. लोकांना सहज उपलब्ध होणारे, त्यांच्यात मिळून मिसळून राहणारे खासदार अशी त्यांची ख्याती आहे. जनतेसाठी चोवीस तास ते उपलब्ध असतात. नगरसेवक ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने दोन वेळा माझ्यावर विश्‍वास टाकला. तो सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. गेल्या साडेनऊ वर्षांपासून करत असलेल्या कामाला मिळालेली पावती आहे. हा पुरस्कार मतदारसंघातील जनतेचा आहे.
श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button