breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिघी येथे महिला आत्मरक्षा प्रशिक्षण शिबीर ; उदय गायकवाड यांचा पुढाकार

पिंपरी ।प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ब्राझीलियन नॅशनल प्लेयर अमृता काळे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती उदय गायकवाड यांनी दिली.

राघव मंगल कार्यालय दिघी येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. रविवार, 20 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबत उदय गायकवाड म्हणाले की, महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांना आत्मसंरक्षणाचीगरज असते. हाच हेतू समोर ठेवून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नॅशनल फ्री स्टाईल किक बाॅक्सिंग चॅम्पिन प्राजक्ता काळे हिच्यासह एक दिवसीय महिला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या ९३२६४२७५०७ व ९८२३३२३०३३ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button