breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WTC Final 2023 : ICC ने क्रिकेटमधील ‘हा’ विवादित नियम केला रद्द

WTC Final 2023 : क्रिकेटमध्ये सॉफ्ट सिग्नलचा नियम अखेर संपणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं हा नियम आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, हा नियम ७ जूनपासून होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पासून हद्दपार होणार आहे. दरम्यान, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये WTC फायनल होणार आहे. या नियमावरून क्रिकेटमध्ये अनेकदा गदारोळ झाला होता, पण आता अनेक वादानंतर हा नियम रद्द होणार आहे.

आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष असताना या निर्णयाला सौरव गांगुली यांनी मान्यता दिल्याचं बोललं जात आहे. तसेच, सॉफ्ट सिग्नल समाप्त करण्याच्या निर्णयाची माहिती डब्ल्यूटीसी फायनल खेळणाऱ्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना देण्यात आली आहे. तसेच, क्रिकबझनं असंही म्हटलं आहे की, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जर मैदानातील नैसर्गिक प्रकाशाची स्थिती खराब असेल, तर फ्लडलाईट्स चालू करता आले असते.

हेही वाचा – १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी उद्धव ठाकरेंची मोठी खेळी

दरम्यान, या सामन्यांसाठी एक रिजर्व दिवस असेल. क्रिकेटच्या इतिहासात सॉफ्ट सिग्नल रूल नेहमीच वादाच्या गराड्यात राहिला आहे. अनेक दिग्गजांनी सॉफ्ट सिग्नल नियमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, अनेक माजी आणि सध्याच्या खेळाडूंनी हा नियम रद्द करण्याबाबत भाष्य केलं होतं. बर्‍याच तज्ञांनी सांगितलं की, सॉफ्ट सिग्नल नियम काढून टाकला पाहिजे आणि मैदानात उपस्थित असलेल्या थर्ड अंपायरनं त्याबद्दल निर्णय घेणं गरजेचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button