breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

SidharthKiaraWedding : ‘शेरशाह’ कपल अखेर अडकले विवाह बंधनात

SidharthKiara : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ७ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. राजस्थानमधील जैसलमेर येथील सुर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री कियारा अडवाणीने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आता आमची कायमस्वरूपी बुकींग झाली आहे. आमच्या पुढील वाटचालीस तुमचे आशीर्वाद आणि प्रेम राहू द्या, असं सुंदर कॅपन्शन दिलं आहे.

कियाराने शेअर केलेल्या फोटोत दोघेही खुप सुंदर दिसत आहेत. यावेळी सिद्धार्थने गोल्डन रंगाची शेरवानी, फेटा घातलेला दिसत आहे. तर कियाराने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. याबरोबर तिने हिरव्या रंगाचे नेकलेस, बिंदी असा लूक केला होता.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाबद्दल अनेक अभिनेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. करण जोहर, मनीष मल्होत्रा, वरून धवन, प्रियांका चोप्रा, आलिया भट, विकी कौशल या सेलिब्रिटींनी इन्स्टा स्टोरी शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. वरून धवनने विशिंग यू ए लाइफ टाइम ऑफ लव्ह, असं लिहलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button