TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

चिंचवड पोटनिवडणूकः अर्ज भरण्यासाठी १० हजारांची चिल्लर घेऊन पोहोचला उमेदवार

पिंपरीः चिंचवड पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काळे यांनी चक्क अर्ज भरायला येताना १० हजार रुपयांची चिल्लर आणली आणि अर्ज भरला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचा चांगलाच खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मकरंद अनासपुरे यांच्या गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा या चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटात अभिनेता अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याचं दाखवण्यात आलं होतं. अगदी तशाच काहीसा प्रकार यावेळी झाल्याचे पहायला मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button