breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“…उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है”

मुंबई |

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीर चोप्राने काल विक्रमी कामगिरी करत, भारताला सुवर्ण पदक मिळवून देत नवा इतिहास घडवला. त्यामुळे भारताने ऑलिम्पिकमधील सर्वाधिक सात पदकांच्या विक्रमाचीही नोंद केली व लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम देखील मोडीत काढला. नीरजने केलेल्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली असून, त्याचे प्रत्येकजण कौतुक करत आहे. सोशल मीडियावर तर कालपासून त्याच्या कामगिरीचं कौतुक व त्याच्यावर शुभेच्छांचा अक्षरशा वर्षाव सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोशल मीडियाद्वारे नीरज चोप्राचं खास शब्दांमध्ये कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात, “ये भाला तो वीर शिवा का और रणभेदी राणा का है, भारत माँ का सपूत नीरज बेटा तो हरियाणा का है। आज तिरंगा ऊँचा चढ़ते देख सीना चौड़ा है, और राष्ट्रगान की धुन पर अपना लहू रगों में दौड़ा है। याद करें जिस युद्धने बरसों गहरा घाव छोड़ा है, उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है ”

भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या १०० वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात आतापर्यंत मिल्खा सिंग आणि पी. टी. उषा यांच्या शतांश सेकंदाच्या फरकाने हुकलेल्या पदकांची उणीव भासायची; पण नीरजच्या पदकाने हा दुष्काळ संपवला. याचप्रमाणे नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भारताने पटकावलेले हे दुसरे सुवर्णपदक ठरले. सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व स्तरातून नीरजचं अभिनंदन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी ट्वीट करत नीरजचं अभिनंदन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button