Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नियमांचे उल्लंघन झाले. मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकसह आजूबाजूच्या ठिकाणी पर्यटक; ट्रेकिंगसह मुक्कामाला मनाई, अशा आहेत सूचना

नाशिक: दोन वर्षानंतर निर्बंध हटल्याने पावसाळी पर्यटनाचा उत्साह वाढला पण, यावेळी नियमांचे उल्लंघन झाले. मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकसह आजूबाजूच्या ठिकाणी पर्यटक आले. यावेळी कळसूबाई शिखरावर पाचशे पर्यटक अडकले. सूचना देऊनही पर्यटकांनी अतिरेक केल्याने वन विभागाने पर्यटनावर निर्बंध लागू केले आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत ट्रेकिंगसह मुक्काला मनाई करण्यात आली असून, पोलिसांच्या मदतीने आता गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील कळसूबाई शिखरावर शनिवारी दुपारी पाचशे पर्यटक अडकले. त्यांना पावसामुळे पर्वतावर जाऊ नये, हा सल्ला दिला होता. तरीही नियम झुगारून अनेकजण तिथे गेले. यामुळे पोलिस, वन पथकासह ग्रामस्थांची धावपळ झाली. वेळीच मदत मिळाल्याने अनर्थ टळला. मात्र, यामुळे आता नाशिक वन्यजीव विभागाने अभयारण्य क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यानुसार कळसूबाई, सांदण दरी, हरिश्चंद्रगड, रतनगड, अमृतेश्वर मंदिराजवळील धबधबे, भंडारदरा व घाटघर धरण, रंधा धबधबा येथे पर्यटकांची तपासणी होणार आहे. ट्रेकिंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यासह गर्दी वाढल्यास पर्यटन बंदी लागू करण्याचे आदेश वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राजूर व भंडारदरा दोन्ही परिक्षेत्रात ‘रेस्क्यू टीम’ सज्ज ठेवल्या आहेत. हुल्लडबाजी, नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील. पोलिस पथकांचीही मदत असेल. नियंत्रणापेक्षा गर्दी वाढल्यास कमल १४४ लागू करण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संमतीने कार्यवाही होईल.

– गणेश रणदिवे,

सहाय्यक वनसंरक्षक

…अशा दिल्या आहेत सूचना

– सांदण दरीसह डोंगरांवर ट्रेकिंग बंद

– नोंदणीकृत पर्यटकांनाच अभयारण्यात प्रवेश

– मद्यप्राशन, बाळगणे, वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर गुन्हे

– धोकादायक ठिकाणी फोटोसेशन, सेल्फीला मनाई

– धबधब्यालगत, पाण्यात पोहण्यास मज्जाव

– गाणी वाजविणारे, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर गुन्हे

– वेळेप्रसंगी संचारबंदी लागू करण्याचा विचार

– जंगलक्षेत्रासह गड-किल्ल्यांवर रात्री मुक्कामास बंदी

– २५ पेक्षा अधिक आसन क्षमतेच्या वाहनांना मनाई

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button