breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

कसबा आणि चिंचवडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत झाले ‘एवढे’ टक्के मतदान

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या तर चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. चिंचवडमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत आहे. तर कसबा पेठमध्ये दुरंगी लढत असल्याचं दिसत आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. चिंचवडच्या मतदारसंघात एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. पोटनिवडणुकीसाठी ५१० मतदार केंद्रावर मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ३ वाजेपर्यंत ३०.५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील १३५ मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापसून ३ वाजेपर्यंत ३०.५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. मतदानादरम्यान तीन ईव्हीएम मध्ये बिघाड झाला आहे. तर मॉकपोल दरम्यान आठ मतदार यंत्रामध्ये बिगाड असल्याचे समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button