breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात 15 हजार 229 नवे रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही घसरली

मुंबई – राज्यात गुरुवारी 15,229 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25,617 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 307 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

गुरुवारच्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दहा हजाराने जास्त आहे. राज्यात एकूण 204974 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 54,86,206 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  94.73% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 1566490 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7055 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आणि विशेषकरुन मुंबईत कोरोनानं प्रकोप केला होता. यात मुंबईमध्ये तर कोरोनानं सर्वात जास्त कहर केला. आता मुंबईतील आकडा हा एक हजारांच्या देखील आता आला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 961 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 897 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,75,193 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16,612 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 500 दिवसांवर पोहोचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button