breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

सत्या आणि श्रावणी एकत्र दिसणार; ‘वेड तुझे’चं नवीन वर्जन लवकरच येणार

20 जानेवारीला ‘वेड तुझे’चं नवीन वर्जन प्रेक्षकांच्या भेटीला 

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा वेड हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. वेड या मराठी सिनेमाने पहिल्या दोन आठवड्यात 40 करोडची कमाई केली आहे. वेडला मिळालेल्या या भरघोस यशानंतर आता रितेश देशमुख चाहत्यांना आणखी एक सरप्राईज देणार आहे.

वेड चित्रपटातील सत्या आणि श्रावणी यांची स्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. सिनेमाच्या शेवटी दोघेसत्या आणि श्रावणी एकत्र आले असले तरी दोघांचं एकत्र गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे प्रेक्षकांसाठी अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख अर्थात सत्या आणि श्रावणी प्रेक्षकांसाठी नवं गाणं रिलीज करणार आहेत. वेड तुझे या गाण्याचं नवं वर्जन ज्यात श्रावणी आणि सत्या एकत्रित दिसणार आहेत. हे गाणं 20 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

वेड या सिनेमात अनेक गाणी आहेत मात्र सत्या आणि श्रावणीचं एकत्रइत असं गाणं नाही. वेड तुझे हे गाणं रितेश आणि जिया शंकर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं आहे. यामध्ये दोघांची केमिस्ट्री जबरदस्त दिसत आहे. मात्र आता वेड तुझेच्या नव्या वर्जनमध्ये श्रावणी आणि सत्या एकत्र दिसणार आहेत. दोघांच्या या गाण्याचा टीझर नुकताच रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वेड या सिनेमाने सर्वाधिक कमाई करणाा मराठी चित्रपट सैराटच्या नावे असलेला विक्रम मोडला आहे. वेड सिनेमाने आत्तापर्यंत 40 करोडची कमाई केली आहे. रिलीजच्या दुसऱ्या रविवारी वेडने 5.70 कोटींची कमाई केली. मीडिया रिपोर्टनुसार सैराटने 4.61 कोटींची कमाई केली होती. आता वेड हा सिनेमा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button