breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंधन दरवाढ काही थांबेना! पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढले

नवी दिल्ली – भारतीय तेल कंपन्यांनी आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई पेट्रोल ११३ रुपयांच्या वर गेले असून डिझेल १०४ रुपये लिटर झाले आहे. बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर, पाटणा या महानगरांमध्ये पेट्रोलच्या दराने ११० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २८ सप्टेंबरपासून आतापर्यंत १९ वेळा पेट्रोलची दरवाढ झाली असून ते ५ रुपये ७० पैशांनी महागले आहे. तर २४ सप्टेंबरपासून आतापर्यंत डिझेलची २२ वेळा दरवाढ झाली असून ते आतापर्यंत ७ रुपयांनी महागले आहे.

काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजी आणि पीएनजी यांच्या दरात सतत वाढ होत आहे. एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता पेट्रोल-डिझेलची रोजच दरवाढ होत आहे. त्यामुळे इंधन स्वस्त होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ४ मे ते १७ जुलै या काळात पेट्रोल ११ रुपये ४४ पैसे आणि डिझेल ९ रुपये १४ पैशांनी महागले होते. ही इंधन दरवाढ रोजच सुरू असल्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल १०७ रुपये २४ पैसे आणि डिझेल ९५ रुपये ९७ पैसे लिटर झाले आहे. कोलकात्यात पेट्रोल १०७ रुपये ७८ पैसे आणि डिझेल ९९ रुपये ८ पैसे, चेन्नईत पेट्रोल १०४ रुपये २२ पैसे आणि डिझेल १०० रुपये २५ पैसे, बेंगळुरूत पेट्रोल ११० रुपये ९८ पैसे आणि डिझेल १०१ रुपये ८६ पैसे, हैदराबादमध्ये पेट्रोल १११ रुपये ५५ पैसे आणि डिझेल १०४ रुपये ७० पैसे लिटर झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button