Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रात्री रस्त्यावर एकटीच भटकत होती चिमुरडी, त्या दोघांनी पाहिलं अन्…; पुढे जे झालं ते ऐकून थक्क व्हाल

बेपत्ता चिमुरडीची आधाराश्रमात सुखरूप रवानगी

नाशिकः रात्री साडेआठ नऊची वेळ. भिरभिरत्या डोळ्यांनी घराची वाट शोधणारी ‘ती’ एका दुकानालगत अश्रू ढाळू लागली. अनोळखी ठरलेल्या परिसरात आपल्या माणसांना शोधण्याचा ‘तिच्या’समोर प्रश्न निर्माण झाला. अशा बिकट प्रसंगी दोन तरुण तिच्या मदतीसाठी धावून आले. रात्री उशिरा तिला निवाऱ्याच्या ठिकाणी पोहोचविले आणि प्रत्येकाचा जीव भांड्यात पडला. जगात कुणीही नसलेल्या त्या अनाथ चिमुकलीला दोघा तरुणांच्या रूपाने भाऊ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. रक्षाबंधनाच्या तोंडावर या बहिणीला अनोखी भेट मिळाली.

आपल्या मैत्रिणींसोबत शाळेत गेलेली आधाराश्रमातील इयत्ता तिसरीतील चिमुकली शाळा सुटल्यावरही परतली नाही. रात्री, उशिरापर्यंत तिचा शोध लागत नसल्याने आधाराश्रातील यंत्रणेसह अन्य सर्वच तणावात होते. शनिवारची ही घटना असून चिमुकली आपल्या नऊ मैत्रिणींसोबत नियमितपणे शाळेत गेली. शाळा सुटल्यावर व्हॅनचालकाच्या नजरचुकीमुळे केवळ नऊ मुलीच व्हॅनमध्ये बसल्या. तेथील गर्दीमुळे चिमुकली व्हॅनमध्ये बसण्याचा प्रयत्नच करत होती, इतक्यात व्हॅन निघून गेली. व्हॅन आधाराश्रमात पोहोचल्यानंतर गाडीत दहाऐवजी नऊच मुली असून, एक चिमुकली नसल्याचे लक्षात आले. तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. तातडीने सरकारवाडा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसही चिमुकलीच्या शोधासाठी निघाले.

सामाजिक कार्यकर्ते अवतारसिंग पनफेर हे दिल्ली दरवाजा होते. प्रभूज ॲथनिक येथील कर्मचाऱ्यांची दुकान बंद करण्याची लगबग सुरू असताना, दुकानाच्या ओट्यावर मुलगी रडत असल्याचे आढळून आले. दुकानातील कर्मचारी सतीश तुपे, विकास शिंदे यांनी तिची मोठ्या भावाप्रमाणे विचारपूस केली. तिला धीर दिला. ती आधाराश्रमात वास्तव्यास असल्याचे कळल्यानंतर त्या दोघांनी भावाप्रमाणे कर्तव्य बजावत तिला सोबत घेत विनाविलंब आधाराश्रम गाठले. ती सुखरूप परतल्याने आधाराश्रम प्रशासनासह सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. रक्षाबंधन सणाच्या तोंडावर या युवकांनी दाखविलेल्या बंधूप्रेमाचे सर्वत्र कौतुक व्यक्त करण्यात येत होते.

सतीश तुपे, विकास शिंदे यांनी प्रसंगावधान राखतांना चिमुकलीला सुखरूप पोहचविले. या कठीण प्रसंगात चिमुकलीला तरुणांच्या रूपाने नवे भाऊच मिळाले. आपल्या कार्यातून त्यांनी सकारात्मकतेची पेरणी केली आहे.

– अवतारसिंग पनफेर,

सामाजिक कार्यकर्ते

रात्री उशिरापर्यंत चिमुकली परत न आल्याने सर्वचजण चिंतेत होते. अशा परिस्थिती संदीप आणि विकास तिच्या मदतीला धावून आले. चिमुकली परत आल्याने सुखावलो.

– राहुल जाधव,

व्यवस्थापक, आधारश्रम

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button