TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

माजी नगरसेवक प्रमोद कुटे व ठाकरे गटाच्या शहरसंघटिका उर्मिला काळभोर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

पिंपरी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक प्रमोद कुटे व पिंपरी-चिंचवड शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, विभागप्रमुख फारुख शेख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे प्रवेश करण्यात आले.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.

उर्मिला काळभोर या ठाकरे गटाच्या महिला संघटिका होत्या. काळभोर यांच्यासह ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विभागप्रमुख फारुक शेख, मंगेश कुटे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून शिवसेनेत प्रवेश केला. शहरातील शास्तीकराचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे अनधिकृत घरांचा प्रश्न सुटणार आहे. प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्या असल्याचे प्रमोद कुटे यांनी सांगितले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वार शिवसैनिकांचा विश्वास आहे. त्यामुळेच ठाकरे गटातील लोक शिवसेनेत येत आहे. शहरात शिवसेनेची ताकद वाढत आहे. शिवसेना-भाजप युतीचे सरकार शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवित आहे. आगामी काळात शहरातील सर्व प्रश्न मार्गी लागतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button