breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमराठवाडाराजकारणराष्ट्रिय

राष्ट्रवादीत त्रास होणाऱ्या माजी आमदाराला बरोबर शिवसेनेत आणलं!

। औरंगाबाद । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांनी आपल्या मनगटावरचं घड्याळ सोडून आज शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिकटगांवकरांच्या विरोधात जाऊन काँग्रेसच्या भाऊसाहेब ठोंबरे, पंकज ठोंबरे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी प्रवेश दिला होता. ही बाब चिकटगांवकरांना खटकली होती. तेव्हापासून त्यांच्या मनात चलबिचल सुरु होती. तसेच आमदार सतीश चव्हाण यांच्याशीही चिकटगावंकर यांचे वारंवार खटके उडत होते. अखेर आपल्या मनातलं द्वंद्वाला पूर्णविराम देऊन चिकटगांवकरांनी ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकटगांवकरांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं. वैजापुरात हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात असून नाराज असलेल्या चिकटगावकरांसाठी दानवेंनी जोरदार फिल्डिंग लावली होती.

ठोंबरे काका पुतणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्याने भाऊसाहेब पाटील चिकाटगावकर हे नाराज होते. ठोंबरेंच्या प्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले होते. तरी देखील पक्ष श्रेष्ठींनी चिकटगावकर यांच्या नाराजीवर कुठलीही प्रतिक्रिया दिली न्हवती. या नंतर चिकटगावकरांनी वैजापूर तालुक्यात दौरा केला होता. गावागावात जाऊन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत विचारणा केली होती. दरम्यान या दौऱ्यातून अनेकांनी शिवसेनेत जाण्याचा विचार मांडला होता.

चिकटगावकर यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं बारीक लक्ष होत. दौऱ्यातील सूर पोषक असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना कळाले. त्यांनी तातडीने राजकीय समीकरणे जुळवत चिकटगावकरांना संपर्क साधला आणि आज ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधून मोहिम फत्ते केली. चिकटगावकर यांनी देखील पक्षात येण्यासाठी दानवे यांच्याशी बोलणी केली होती, अशीही माहिती कळतीये. चिकटगावकर यांच्या रुपाने वैजापुरात एक मोठा नेता शिवसेनेला मिळाला असून येत्या विधानसभेत याचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता आहे.

रमेश बोरनारेंची कमी चिकटगावकर भरून काढणार?
वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी शिंदे गटात प्रवेश करुन ठाकरेंना मोठा दणका दिला होता. शिंदे गटातल्या प्रवेशानंतर त्यांनी वैजापुरात मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. मात्र आता चिकटगावकरांच्या रुपात ठाकरेंना मोठा आधार मिळाला आहे. रमेश बोरनारे यांच्याविरोधात बळ एकवटण्यासाठी ठाकरेंच्या ताफ्यात आणखी एक सैनिक दाखल झाल्याने बोरनारे यांच्यासमोरील अडचणी वाढल्याची चर्चा वैजापुरात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button