breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

स्मार्ट सिटीचा दर्जा उंचाविण्याचे काम असंघटित बांधकाम कामगार करताहेत – इरफान सय्यद

महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे 1250 कामगारांना सेफ्टी किटचे वाटप 
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत. या स्मार्ट सिटीचा दर्जा उंचाविण्याचे काम असंघटित बांधकाम कामगार करत आहेत. कामगार सर्वांना घरे बांधून देत आहेत. इमारती बांधून देत आहेत. परंतु, याच कामगारांना हक्काचे घर नव्हते. कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच कामगारांना स्वत:चे घर देण्याची घोषणा केली आहे. शहरीभागातील कामगाराला घरासाठी साडेचार लाखाचा तर ग्रामीण भागातील कामगाराला दीड लाखाचा निधी भेटणार असल्याचे महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते इरफान सय्यद यांनी सांगितले. तसेच कामगारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून त्यासाठी बांधकाम कामगारांच्या सदैव पाठीशी राहू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 
महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे भोसरीतील क्वालिटी सर्कल हॉल येथे आज (शनिवारी) 1250 बांधकाम कामगारांना सेफ्टी किटचे वाटप  करण्यात आले. या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सचिन सानप, आबा लांडगे, किसन बाऊकर, युवराज कोकाटे, परशुराम आल्हाट, वाटेकर मामा आदी उपस्थित होते. बांधकाम कामगारांना 1250  आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेण्यासाठी या सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्यात  भीमाशंकर पुलारी – साठ हजार रुपये, बंडू पुलारे – सात हजार रुपये, सुजाता पुजारी – दोन हजार पाचशे, निशा इंगळे – दहा हजार रुपये, प्रेरणा इंगळे – अकरा हजार, अभिषेक येळे – 20 हजार रुपये यांना धनादेश देण्यात आले.
इरफान सय्यद म्हणाले, “महाराष्ट्र मजदूर संघटनेची मुहुर्तमेढ ज्याकरिता केली होती. ती आज सफल  झाली आहे.  इतर कामगारांना लाभ मिळवून देऊ शकतो. परंतु, असंघिटत, दुर्लक्षित कामगारांना लाभ मिळवून देणे कठिण काम असते. त्यांच्याकडे कोणीच बघत नाही. परंतु, असंघिटत कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यसाठीच महाराष्ट्र मजदूर संघटनेची स्थापना केली असून ते काम आज करत आहोत. त्यामुळे हा आनंदाचा क्षण आहे”
“महाराष्ट्र मजदूर संघटनेने नाक्यावरच्या कामगाराला सर्वांत जास्त पैसे मिळवून दिले आहेत. आणखीन पाच हजार कामगारांची नोंदणी चालू आहे. त्यांनाही लाभ मिळवून दिले जातील. घर देत आहात, ही आनंदाची बाब आहे. परंतु, हक्काचा कामगार नाका देण्यात यावा. लवकरत लवकर नाका द्यावा. अन्यथा सर्वात मोठा मोर्चा महापालिकेवर काढला जाईल” असा इशारा सय्यद यांनी दिला.
शासनाच्या विविध योजनेचा लाभ असंघटित बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मिळावा म्हणून कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पाच हजारच्या नोंदणी झाली आहे. आतापर्यंत जवजवळ हजारो कामगारांना संघटित करण्याचे काम महाराष्ट्र मजदूर संघटनाने केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करत असताना शासन दरबारी मागण्या मांडणार आहेत.
बांधकाम कामगार संघटित झाल्याने अठरापगड जातीचे बलुतेदार ही एकत्रित आले आहे. सरकारची कामगारांविषयी भूमिका ही हिताची आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे मजुराला हक्क प्राप्त होणार आहे. शासन योजनांचा लाभ व अर्थसहाय्य मिळणार आहे त्यादृष्टीने आपण शासन दरबारी जाऊन पाठपुरावा करु ग्वाही त्यांनी दिला. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम मजुरांना सुरक्षा संचाचे वाटप यावेळी 1250 कामगारांना देण्यात आले. शहरातील हजारो बांधकाम कामगारांना याचा फायदा होणार आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे 29 योजनांलाभ कामगारांना घेता यावा यासाठी त्यातील काही योजनांचा लाभ आज  देण्यात आला.
या सुरक्षा किटमध्ये मजुरांना प्रोटेक्टिव्ह शुज, मास्क, इअरिंग, हेल्मेट, सेफ्टी हॅंड हॉनेश, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, तसेच प्लॅस्टिक चडई, सोलर टॉर्च, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, खांद्यावरील बॅग, पत्र्याची पेटी अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येकी कामगारांना पाच हजार रुपये व सुरक्षा रक्षक संच देण्यात आला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button