पिंपरी / चिंचवडपुणे

पती-पत्नीने केला एका इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे | अज्ञात कारणावरून झालेल्या भांडणातून पती-पत्नीने एका इसमाच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. चिंचवड येथे शुक्रवारी (दि.13) दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला.संतोष उर्फ पप्पू प्रभाकर लोंढे (वय 29 ) असं या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची बहीण यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी संजय जाधव व त्याची पत्नी (रा. चिंचवडचे नगर, चिंचवड) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 504, 34 अंतर्गत खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय जाधव याच्या पत्नीने अज्ञात कारणावरून झालेल्या भांडणातून संतोष लोंढे यांना ढकलून दिले. त्यानंतर आरोपी संजय जाधव याने लोंढे यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button