breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडकरांना भेटण्यासाठी आयुक्तांनी ‘ही’ वेळ ठेवली राखीव

पिंपरी महाईन्यूज

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना कामकाजानिमित्त भेटण्यासाठी येणा-या विविध अभ्यागतांसाठी राखीव वेळ ठेवण्यात आली. बुधवार वगळता सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या दरम्यान अभ्यागतांना महापालिका आयुक्त यांना भेटता येईल, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

महापालिकेशी संबंधित विविध कामकाजाच्या अनुषंगाने अभ्यागत आयुक्तांना विविध कामकाजाच्या अनुषंगाने पिंपरीतील महापालिका मुख्य प्रशासकीय भवन आयुक्त कार्यालयात भेटी करीता समक्ष येत असतात.  या अभ्यागतांना भेटीकरीता निश्चित वेळ आयुक्त राजेश पाटील यांनी राखून ठेवला आहे.

आयुक्तांकडे महापालिकेसंबंधित विस्तृत स्वरुपाचे कामकाज असल्याने काही प्रसंगी महापालिकेचे संबंधित अधिकारी अथवा पदाधिकारी यांच्यासमवेत कामकाजाच्या अनुषंगाने बैठका आयोजित केलेल्या असतात.  तसेच अत्यावश्यक कामकाज चालू असते.  परिणामी कामकाजानिमित्त आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या अभ्यागत अथवा नागरिकांना वेळ देता येत नाही.  म्हणून अभ्यागत अथवा नागरिक यांना आयुक्तांना भेटण्यासाठी कामकाजाची वेळ निश्चित करण्यात आली आहे.  मात्र काही प्रसंगी आयुक्त हे अन्य शासकीय कार्यालय, मंत्रालय मुंबई येथे कामकाजानिमित्त जात असतात.  तसेच महापालिका सभा, स्थायी समिती सभा, विधी समिती सभांकरीता सभागृहामध्ये उपस्थित असतात.  अशा प्रसंगी ते नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत, असे आयुक्त पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button