breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

Big Breaking : केंद्राचे पथक दुष्काळ पाहणीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार

मुंबई : आपल्या सर्वांना माहिती आहे कि, यावर्षी राज्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठीच राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाने अखेर मुहूर्त ठरविला आहे.

हे पथक येत्या १३ व १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. हे पथक केंद्रीय कृषी सहसचिव प्रिय रंजन यांच्या नेतृत्वाखालील १२ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून या पथकाच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागून होते.

हेही वाचा  –  ‘नीलम गोऱ्हे शिवसेनेत आल्या, खा-खा खाल्लं आणि ताटही घेऊन गेल्या’; संजय राऊतांचा खोचक टोला

हे पथक कोणत्या भागांची करणार पाहणी…

  • छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात एक आणि दुसरे पथक बीड व धाराशिव जिल्ह्यांत १३ डिसेंबर रोजी पाहणी करतील.
  • तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ डिसेंबर रोजी पुणे व सोलापूर, नाशिक व जळगावमध्ये दोन वेगवेगळे पथके जातील.
  • पाहणी केल्यावर १५ डिसेंबर रोजी पथक पुण्यात बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला देईल.

दरम्यान, केंद्रीय पथक आपला अहवाल केंद्रीय मंत्री समितीसमोर ठेवलं व दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्याला नेमकी किती मदत करायची, याची शिफारस या समितीकडून केंद्रीय कॅबिनेटला केली जाईल. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर राज्याला मदतीचे वितरण होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button