breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमहिला दिनराजकारणराष्ट्रिय

देवांग कोष्टी समाजाच्या ५ हजार मतदारांचा भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना देवांग कोष्टी समाज संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबाबत संघटनेच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. चिंचवड मतदारसंघात वास्तव्याला असणारे देवांग कोष्टी समाजातील पाच हजार बांधव अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भरघोस मतांनी निवडून आणणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

देवांग कोष्टी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश तावरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, “देवांग कोष्टी समाजाचे सुमारे पाच हजार मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहण्यास आहेत. समाजातील आम्ही सर्वजण सुरूवातीपासून आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक आहोत. आम्ही कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतो. जगताप कुटुंबाचेही आम्हाला कायम सहकार्य लाभले आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ सर्वांवर आली आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी केलेल्या मदतीस स्मरून आम्ही सर्वांनी एकमताने ठराव करून पोटनिवडणुकीत अश्विनी लक्ष्मण जगताप यांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत. आम्ही सर्व समाज अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भरघोस मतांनी निवडून आणू याची आम्ही ग्वाही देतो, असे नमूद आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button