breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

आरोग्याच्या दृष्टीने ‘जागतिक स्तरावर खादीची मोठी भूमिका’; पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • मागील 8 वर्षांत खादीच्या (khadi) विक्रीत 4 पटीने वाढ
  • भारताच्या खादी उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्यात महिला शक्तीचाही मोठा वाटा

अहमदाबाद । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा गुजरात दौरा आहे. त्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संध्याकाळी त्यांच्या आई हिराबेन मोदी यांची भेट घेतली. साबरमती नदीवरील अटल पुलाचे उद्घाटन आणि खादी महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमधील रायसन भागातील त्यांच्या आईच्या निवासस्थानी पोहोचले. याच संदर्भात त्यांचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांनी सांगितले की, नरेंद्र मोदींनी संध्याकाळी उशिरा त्यांच्या आईची भेट घेतली आणि त्यांच्या सोबत अर्धा तास वेळ घालवला. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईची भेट घेतल्या नंतर ते राजभवनकडे रवाना झाले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार पासून गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज रविवारी मोदी कच्छ आणि गांधीनगरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी होतील. त्याच बरोबर त्यांनी भारतीय खादीचे सुद्धा कौतुक केले.

भारतात खादीचे विक्रमी उत्पादन आणि विक्री होत आहे
पंतप्रधान मोदी म्हणाले की आज भारतातील टॉपचे फॅशन ब्रँड खादीशी संलग्न होण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. त्याच बरोबर आज भारतात खादीचे विक्रमी उत्पादन होत आहे आणि विक्रमी विक्रीसुद्धा होत आहे. मागील 8 वर्षांत खादीच्या विक्रीत 4 पटीने वाढ झाली आहे. भारताच्या खादी उद्योगाच्या वाढत्या सामर्थ्यात महिला शक्तीचाही मोठा वाटा आहे. महिलांचंही मोठं योगदान आहे. देशातील आपल्या बहिणी आणि मुलींमध्ये उद्योजकतेची भावना रुजलेली आहे. गुजरातमधील सखी मंडळांचा विस्तार हे याचे उत्तम उदाहरण आहे.

खादी प्रेरणास्रोत बानू शकते
पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी काल साबरमती नदीवरील ‘अटल ब्रिज’ या ब्रिजचे उद्घाटन केले. सायंकाळी येथील खादी महोत्सवाच्या कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहिले आणि त्यांनी तेथील जनतेला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले, अटल पूल हा साबरमती(sabarmati नदीच्या दोन काठांना जोडणारा तर आहेच पण त्याशिवाय तो नावीन्यपूर्ण सुद्धा आहे. हा पुतळा बनवताना गुजरातच्या प्रसिद्ध पतंग महोत्सवाची काळजी सुद्धा घेण्यात आली आहे. इतिहास साक्षी आहे की खादीचा एक धागा स्वातंत्र्य चळवळीचे बळ बनला, त्याने गुलामीच्या बेड्या सुद्धा तोडल्या. खादीचा हाच धागा विकसित भारत करणार आहे. त्याच बरोबर हाच खादीचा धागा स्वावलंबी भारताचे(india) स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणास्त्रोत बनू शकतो. असंही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

जागतिक स्तरावर खादीची मोठी भूमिका
कपड्यांमध्ये खादी हे अत्यंत टिकाऊ आहे. असंही मोदी म्हणाले. त्याच बरोबर खादी हे पर्यावरणपूरक कपड्याचे देखील उदाहरण आहे. खादीमध्ये(khadi) सर्वात कमी कार्बन फूटप्रिंट आहे. असे अनेक देश आहेत जिथे तापमान जास्त आहे, खादी देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे खादी जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावू शकते. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button