breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. शरद पवार महाविकास आघाडीचे घटक आहेत. समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी आलो आहे. शरद पवार भक्कमपणे राष्ट्रीय विरोधी पक्षांच्या आघाडीत आहेत. महाविकास आघाडी तशीच राहणार आहे. काही माणसं गेल्यामुळे परिणाम होणार आहे. तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत.

हेही वाचा – चिंचवडकरांना आता कळलं असेल…पोटनिवडणुकीत राहुलदादाला तिकीट का नाकारले?

अजित पवार असं करणार माहिती होते. फक्त वाटाघाडी चालल्या होत्या. आता सुद्धा अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द असल्याची आमची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना बाजूला करुन किंवा अध्यक्षांकडून विरोधी निकाल घेऊन आपोआप बाजूला गेले, की मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिल्याचं माहिती आहे, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवार यांनी प्रीतीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना केलं अभिवादन केलं आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, अंकुश काकडे आणि मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button