breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: धक्कादायक! 45 वर्षीय कोरोना बाधित रुग्णानं रुग्णालयात उचललं टोकाचं पाऊल

चिपळूण: देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. देशात जवळपास कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 लाख पार झालेला आहे. अनेकांच्या मनात कोरोनाची खूप भीती असल्याचंही पाहायला मिळत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूणमध्ये घडलेला ज्यामुळे रुग्णालयात मोठी खळबळ उडालेली आहे.

45 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं 6 ऑगस्टला या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. हा व्यक्ती चिपळूणमधील आंबडस गावातील रहिवसी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. त्याच्यावर कामथे रुग्णालयात कोविड-19चे उपचार सुरू होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button