breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘अप्रेंटिसशिप’च्या माध्यमातून दहा हजार युवक – युवतींना रोजगार मिळणार

  • भोसरी येथे ‘सॉफ्टझील’तर्फे अवेरनेस प्रोग्रामचे आयोजन

पिंपरी/ प्रतिनिधी
भारत सरकारच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (एनएपीएस) अंतर्गत युवक युवतींसाठी रोजगार निर्मिती करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीमची माहिती जास्तीत जास्त उद्योग- व्यवसायिकांना मिळावी यासाठी एमआयडीसी भोसरी येथे सॉफ्टझील टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड व ऑल इंडिया रबर असोसिएशन आणि रबर सेक्टर स्किल कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल अप्रेंटिसशिप अवेरनेस प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. या अवेरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून जवळपास दहा हजार युवक युवतींना रोजगार मिळणार आहे.

यावेळी सुचिता रॉय (प्रादेशिक व्यवस्थापक – पश्चिम रबर, रासायनिक आणि पेट्रोकेमिकल कौशल्य विकास परिषद), सदाशिव पी. काळे (अध्यक्ष- पुणे चॅप्टर, ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन), दौलत बाफाना (व्यवस्थापकीय संचालक, सॉफ्टझील टेक्नॉलॉजी प्रा. लि.) विक्रम माकर – (अध्यक्ष, ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन), प्रशांत वाणी – (अध्यक्ष – वेस्टर्न रीजन, ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन), रोहित बंसल – (उपाध्यक्ष- ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन), विनोद पाटकोटवार – (व्यवस्थापकीय कमिटी, ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन) आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नॅशनल अप्रेंटिसशिप अवेरनेस प्रोग्रामचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून युवकांना रोजगाराच्या अनेक संधी सॉफ्टझील टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने निर्माण केल्याबद्दल ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे विक्रम माकर यांच्या वतीने संचालक दौलत बाफना यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

सुचिता रॉय म्हणाल्या, नॅशनल अप्रेंटिसशिप प्रोग्रामच्या अंतर्गत आपण विविध इंडस्ट्रीजसाठी अप्रेंटिसशिप प्रमोशन करत आहोत, त्यांनी अप्रेंटिसशिपसाठी सदस्य नेमणे गरजेचे आहे, यामुळे इंडस्ट्री व बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्याच बरोबर विद्यार्थी सरकारच्या कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण घेऊ शकतात. या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये अप्रेंटिसशिप म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

दौलत बाफना म्हणाले, करोनाच्या पहिल्या लाटेत देशातील सर्व उद्योग व्यवसाय बंद होते, परंतु आता परिस्थिती आटोक्यात येत आहे. याकाळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यात नवीन येणारे युवक युवतींना जॉब मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकारची अप्रेंटिसशिप योजना फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायांना आर्थिक आधार मिळणार आहे. भोसरी येथे पार पडलेल्या नॅशनल अप्रेंटिसशिप अवेरनेस माध्यमातून जवळपास दहा हजार युवक युवतींना रोजगार मिळणार आहे.

सदाशिव काळे म्हणाले, अप्रेंटिसशिपसाठी कायदा १९६१ नुसार बेरोजगारांना विविध कंपन्यांत व्यावहारिक व ऑन द जॉब कौशल्य विकसित करण्यासाठी सुमारे एक वर्षापर्यंत प्रशिक्षण दिले जाते. तसेच, भारत सरकार व कंपनी यांच्यातर्फे प्रतिमाह भत्ता देखील देण्यात येतो. या अंतर्गत काही कंपन्या भत्ता देतात. त्यामुळे ही एकप्रकारे नोकरी असते. आताच्या पिढीने अप्रेंटिसशिपकडे तसेच त्यांच्या पालकांनी नोकरी या दृष्टिकोनातून बघायला हवे. भारत सरकारच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार मंत्रालयातर्फे हा उपक्रम राबविला जातो.

 

अप्रेंटिसशिप विद्यार्थ्यांना फायदे कोणते ?

१. भारत सरकारतर्फे कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र मिळते.
२. यातील साधारणपणे ६५ टक्के लोकांना नंतर त्याच कंपनीत पूर्ण वेळ नोकरी देखील दिली जाते. उपलब्ध नोकऱ्या व विद्यार्थ्याचे कौशल्य यांवर ते अवलंबून असते.
३. सरकारी कंपन्या तसेच उत्तम दर्जाच्या खासगी कंपन्यांत खूप सहजतेने अप्रेंटिसशिप व त्यानंतर नोकरी मिळविता येते.
४. उद्योगात प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
५. बेरोजगारांसाठी एकप्रकारे ही नोकरी असते.
६. एकाच वर्षात देशातील लाखो बेरोजगार याचा फायदा घेतात.
७. अभियांत्रिकीच्या विदयार्थ्यांना व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना भत्ता मिळतो.
८. या अनुभवामुळे इतर कंपन्यांत लगेच नोकरी मिळते.

ज्या कंपनीत तीसपेक्षा जास्त कामगार काम करतात अशा सर्व कंपन्यांना अप्रेंटसशिप देणे कायद्याने बंधनकारक आहे. बेरोजगारांना कौशल्य, ज्ञान, अनुभव व त्याबरोबरच पैसा मिळवून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम भारत सरकारतर्फे खूपच चांगल्या पद्धतीने राबविला जातो. एकीकडे बरेचसे विद्यार्थी बेरोजगार असताना त्यांना इतक्या फायदेशीर उपक्रमाची माहितीच नसल्याचे व त्यामुळे खूपच कमी प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असल्याचे चित्र यामुळे दिसून येते. फार्मसी, आर्किटेक्चर,अभियांत्रिकी, डिप्लोमा, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट व इतर १६२ प्रकारच्या कोर्सेसचे उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.

नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे

१. आधारकार्ड, २. बँकेची माहिती,
३. पदवी प्रमाणपत्र

अप्रेंटसशिपसाठी अर्ज कसा करावा
१. www.apprenticeship.gov.in वा www.mhrdnats.gov.in या वेबसाइटवर अर्ज करावा.
२. पदवीधर, कंपन्या व महाविद्यालये हे तिन्ही या वेबसाइट्सवर नोंदणी करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button