breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात

LPG Cylinder Price | आज (८ मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्याची घोषणा केली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरून केली. या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक बोजा कमी होईल.

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, आज महिला दिन आहे. त्यामुळे आमच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका होणार आहे. तसेच या निर्णयाचा फायदा नारी शक्तीला होणार आहे.

हेही वाचा    –      Women’s Day | आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्चलाच का साजरा करतात?

पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले की, आम्ही आमच्या नारी शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला सलाम करतो. तसेच महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षण, उद्योग, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण्यासाठी कटिबद्ध आहोत.

दरम्यान, केंद्र सरकारने कालच (दि. ७ मार्च) मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या अनुदानात ३०० रुपयांची सूट देण्याच्या योजनेला एक वर्षांची वाढ दिली होती. आता मार्च २०२५ पर्यंत ही सूट दिली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button