breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

TATA IPL 2022: लखनऊ नवाबी एक्सप्रेस सुसाट! दिल्ली संघावर केली सहा धावांनी रोमहर्षक मात!

टीम ऑनलाईन : ऋषभ पंतच्या दिल्ली संघाने या स्पर्धेत सुरुवात चांगली केली होती, पण ते सातत्य त्यांना  कायम ठेवता आले नाही, आजही त्यांनी चांगली झुंज दिली, पण तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही तो नाहीच. त्यांच्या संघाला विजयासाठी फक्त सहा धावा कमी पडल्या,पण याच सहा धावांच्या विजयाने लखनऊ संघाला मिळालेला आणखी एक विजय त्यांच्या पदार्पणातल्या विजयी कामगिरीत आणखी एक लखलखता हिरा कोंदला गेला आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर  टाटा आयपीएल 2022 मधल्या आजच्या 45 व्या सामन्याला लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात भिडंत झाली, ज्यात लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

डीकॉक आणि राहुलने पहिल्या गड्यासाठी 26 चेंडूत 42 धावांची खणखणीत सलामी दिली. डीकॉक नेहमीप्रमाणे कडक खेळत होता मात्र शार्दुल ठाकूरने त्याला आपल्या पहिल्या षटकात बाद करून ही जोडी फोडली. डीकॉकने 13 चेंडूत 23 धावा काढल्या,त्याच्यानंतर आलेल्या दीपक हुडाने पहिल्याच चेंडूपासून आपली बॅट परजायला सुरुवात केली.

दुसऱ्या बाजूने राहुलही फटकेबाजी करत होता, बघताबघता या जोडीने 61 चेंडूत 95 धावांची वेगवान भागीदारी करत दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्ला बोल केला. याचदरम्यान या दोघांनीही आपापले वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केले.

ही जोडी पंतच्या डोकेदुखीत भर घालत असतानाच मिडास टच असलेल्या ठाकूरने दीपक हुडाचा आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत ही जोडी तोडली, मात्र तो बाद झाल्यावरही राहुलने आक्रमक फलंदाजी करत संघाला चांगली धावसंख्या गाठून देण्यात मोठा वाटा उचलला.

राहुललाही ठाकूरनेच बाद केले,राहूलने केवळ 51 चेंडूत 5 षटकार आणि चार चौकार मारत 77 धावा केल्या,तो बाद झाला आणि तसाच धडाका चालू ठेवत स्टोयनिस आणि कृणाल पंड्याने लखनऊ संघाला 195 धावांची मोठी मजल मारून दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button