TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“शाईफेक” प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करा!

  • पिंपरी- चिंचवड भाजपाची आक्रमक मागणी
  • पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन

पिंपरी | प्रतिनिधी

राज्याचे उच्च, तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत, शाई फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.

याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे,
माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, राहुल जाधव, आमदार उमा खापरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, महिला शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवार दि. १० डिसेंबर २०२२ रोजी चिंचवडगाव येथे नियोजित कार्यक्रमासाठी पालकमंत्री मा.ना. चंद्रकांत पाटील आले असता पूर्व नियोजित कट करून काही व्यक्तींनी त्यांच्यावर केमिकल युक्त रासायनिक द्रव्य त्यांच्या जीवावर बेतेल अशा पद्धतीने टाकून त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. सदर कृत्य हे काही ठरविक संघटना आणि व्यक्तींनी त्या बद्दल नियोजनबद्ध कट आणि कारस्थान करून “सोशल मीडिया”द्वारे चिथावणीखोर वक्तव्ये देऊन वातावरण कलुषित केले होते. कार्यक्रमस्थळी जमण्याचे आवाहन करून कार्यक्रमात विघ्न आणण्याचे आणि समाजात दुही पसरवण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता हे त्यांच्या “सोशल मीडिया”वरील पोस्ट मधून स्पष्ट होत आहे. मात्र, सायबर सेलने त्यावर काहीही कारवाही केली नाही. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता यातून दिसून येत असून संबधित अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी. योग्य वेळेस खबरदारी घेतली असती, तर अनुचित प्रकार टाळता आला असता. सदर व्यक्ती आणि “सोशल मीडिया” वरील त्यांची पेजचे व त्यांचे ऍडमिन यांवर सायबर गुन्हेगारी अंतर्गद कडक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच, सदर व्यक्तीवर पुढील २ दिवसांत कारवाही न झाल्यास मोठया प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button