पिंपरी / चिंचवड

तडीपार आरोपींचा शहरात वावर; दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

तडीपार केलेले आरोपी पोलिसांची परवानगी न घेता शहरात येत आहेत. शस्त्र बाळगणे तसेच गुन्हे करण्यापर्यंत या तडीपार आरोपींची मजल जात आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दोन तडीपार आरोपीना अटक केली आहे. दोघांकडे कोयता आणि तलवार अशी शस्त्रे आढळली आहेत.

पवन बंडू शिरसाठ (वय 22), अजय अश्रुबा दुनघव (वय 25, रा. दोघे रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी स्मशानभूमीजवळ दोघेजण शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोशी स्मशानभूमीजवळ सापळा लाऊन कारवाई केली. आरोपींकडे कोयता आणि तलवार अशी घातक शस्त्रे आढळून आली. त्यांची चौकशी केली असता दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्यांचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी ते शहरात आले. दोघांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button