breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ऑनलाईन औषध विक्री तत्काळ थांबवा; इंडियन मेडिकल असोसिएशनला पत्र

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांची मागणी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

ऑनलाईन फाॅर्मसीला कायद्याने बंदी असूनही अनेक डाॅक्टर आणि नोंदणीकृत मेडीकल प्रॅक्टिशनर ऑनलाईन औषध विक्रीसाठी सहकार्य करीत आहेत. या बेकायदेशीर विक्री तत्काळ थांबवावी, अशी मागणी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले की, आपल्याकडील रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर हे ॲानलाईन औषध विक्रीस सहकार्य करताना दिसत आहेत. ॲानलाईन फार्मसी हे कॅन्सर सारखे असून लोकहिताच्या दृष्टीने खुप घातक आहे. अशा प्रकारे आपण ॲानलाईन फार्मसीला सहकार्य केले तर मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, नशेच्या गोळ्या या सहजपणे विक्रीसाठी ॲानलाईन उपलब्ध होतील.

सदर ॲानलाईन औषध विक्री करणारे मेडलाईफ नामक आपल्याकडील रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टीशनर यांना प्रिस्क्रीप्शन पॅड त्यांची जाहिरात विविध प्रलोभन दाखवून त्यावर औषध प्रिस्काईब करून रूग्णास ॲानलाईन औषध खरेदी करण्यास प्रवृत्त करीत आहे. ॲानलाईन औषध विक्री करणे कायद्यांने अमान्य आहे. ॲानलाईन औषध विक्रीस आपणही कडाडून विरोध करून आपल्या संघटने तर्फे शाश्वत पाठपुरावा करावा, ॲानलाईन औषध विक्री थांबविण्यास सहकार्य करावे. तसेच रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टीशनर यांना योग्य ते मार्गदर्शन करून सहकार्य मिळावे, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button