breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कार्यकर्त्यांच्या हत्येविरोधात भाजपचे प्रदर्शन, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेकजण जखमी

पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी सरकारविरोधात गुरुवारी भाजपने रस्त्यावर उतरुन तीव्र प्रदर्शन केले. भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या नेतृत्वात राज्यभर ‘नबाना चलो’ आंदोलन चालवण्यात आले.यात राज्यात होत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मुद्दा उचलण्यात आला. विजयवर्गीय म्हणाले की, आम्ही शांतीपूर्ण पद्धतीने प्रदर्शन करत होतो, पण ममता बॅनर्जी यांनी या प्रदर्शनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गुंडासोबत मिळून आमच्यावर दगडफेक केली.

दरम्यान, भाजप नेत्या लॉकेट चटर्जी म्हणाल्या की, कोलकाताच्या खिदिरपूर परिसरात पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला, दगडफेक केली. यात अनेकजण जखमी झाले. पोलिसांना अशाप्रकारे कारवाई करताना कदी पाहिलं आहे का ? दरम्यान कोलकाताच्या भाजप कार्यालयात शेकडो कार्यकर्ते जमा झाले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

2 ऑक्टोबरला बंगाल भाजपाध्यक्ष दिलीप घोष यांनी गृह मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. यात 8 ऑक्टोबरला राज्यव्यापी प्रदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button