breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

Sushant Singh Suicide Case: रिया विरुद्ध FIR दाखल केल्यानंतर NCBचे गोव्यात छापे, ड्रग्ज तस्कर टार्गेटवर

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आता नवंनवीन माहिती समोर येत आहे. बुधवारीच सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती विरोधात अंमली पदार्थाच्या वापरा प्रकरणी FIR दाखल झालेला होता. Narcotics Control Bureau म्हणजे NCBने रिया विरुद्ध FIR दाखल केलेला होता. त्यानंतर NCBने गोव्यात आपलं लक्ष केंद्रीत केलेलं असून ड्रग्ज पुरवढा करणाऱ्या तस्कराचा शोध घेतला जात आहे. ड्रग्ज तस्कर गौरव आर्य हा अभिनेत्यांना अंमली पदार्थ पुरवत होता अशी माहिती पुढे आलेली असून त्याचा शोध घेण्यासाठीच हे छापे असल्याचं सांगितलं जात आहे.

NCBला गौरवचा सुगावा लागला असून लवकरच त्याता ताब्यात घेतलं जाऊ शकतं अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. NCBने रिया विरुद्ध FIR दाखल केला असून त्यामुळे रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत आलेली आहे. सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवढा केला जात होता याचे पुरावे ईडी ला मिळाल्याचा दावा NCBचे संचालक राकेश अस्थाना यांनी केलेला होता. त्यानंतर रिया विरुद्ध  कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ईडीने NCBला पाठविलेल्या पत्रात ड्रग्ज संदर्भात पुरावे देण्यात आल्याची माहितीही  अस्थाना यांनी दिलेली आहे. यामुळे आता NCBही त्या अँगलने तपास करणार आहे. यासंदर्भातले रियाचे काही Whatsapp चॅटही प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडालेली होती. आता एनसीबीच्या संचालकांनीच पुरावे मिळाल्याचा दावा केल्याने प्रकरण अधिक गंभीर झालेलं आहे.

पहिले चॅट

हे चॅट रिया आणि गौरव आर्यामधील आहे. गौरव तोच इसम आहे, जो ड्रग डीलर असल्याचे म्हटले जात आहे. या चॅटमध्ये असे म्हटले आहे की, ‘जर आपण हार्ड ड्रग्जबाबत बोललो तर मी जास्त ड्रग्जचा वापर केला नाही आहे’. हा मेसेज रियाने 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठवलेला होता.

दुसरे चॅट

दुसऱ्या चॅटमध्ये रियाने गौरवशी बातचीत केलेली आहे. यामध्ये रियाने गौरवला विचारले आहे की, ‘ तुझ्याकडे MD आहे का?’. एमडीचा अर्थ MDMA असा होतो जे खूप स्ट्राँग ड्रग आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button