ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इम्रान खान यांना ‘सर्वोच्च’ झटका, ९ एप्रिलला अविश्वास ठरावावर मतदान

इस्लामाबाद | इम्रान खान  यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानात राजकीय पेच निर्माण झाला असताना उपसभापतींचा निर्णय असंवैधानिक असल्याचे म्हणत न्यायालयाने इम्रान खान यांना दणका दिलाय. आता इम्रान खान यांना ९ एप्रिल रोजी नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार आहे. नॅशनल असेंब्लीमध्ये ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागेल.

आज (गुरुवारी), 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरचा निर्णय असंवैधानिक ठरवला, ज्यामध्ये विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला होता. याशिवाय न्यायालयाने नॅशनल असेंब्लीही बहाल केली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, इम्रान खान यांना अखेर नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास प्रस्तावावर ९ एप्रिल रोजी मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. इम्रान खान यांनी आपल्या कायदेशीर टीमसोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले की, मला सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक निर्णय मान्य आहे. सुप्रीम कोर्टाबाहेरही दंगलविरोधी फौज मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आली होती. न्यायालयाने पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या सचिवांना समन्स बजावले होते. पीएमएल-एनचे शाहबाज शरीफ आणि पीपीपीचे बिलावल भुट्टो झरदारी यांच्यासह मोठ्या संख्येने विरोधी नेते सुप्रीम कोर्टात पोहोचले होते.

लोकांच्या प्रार्थना कामी आल्या, पाकिस्तानचा वाचला-शाहबाज शरीफ

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ म्हणाले की, या निकालानंतर पाकिस्तानचा वाचला, असं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या लोकांच्या प्रार्थना कामी आल्याचंही ते म्हणाले. अविश्वास ठरावावरील मतदानादरम्यान आपण सरप्राईज देऊ, असंही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नॅशनल असेंब्ली आणखी मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उपसभापतींचा निर्णय चुकीचा होता, सरन्यायाधींचं मत

नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी यांनी ३ एप्रिल रोजी दिलेला निर्णय चुकीचा होता, असं मत सुनावणीदरम्यान पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी व्यक्त केले. खरं तर, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे उपसभापती कासिम सूरी यांनी रविवारी सरकार पाडण्याच्या परदेशी षडयंत्राचा हवाला देत अविश्वास प्रस्ताव नाकारला होता. काही मिनिटांनंतर, राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सूचनेनुसार नॅशनल असेंब्ली विसर्जित केली होती.नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम सूरी यांचा निर्णय प्रथमदर्शनी कलम 95 चे उल्लंघन आहे, असंही निरीक्षण सरन्यायाधीशांनी मांडलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button