भोसरीत रंगणार नाईट हाफपीच क्रिकेट स्पर्धा
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पिंपरी : आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नाईट हाफपिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान भोसरी गावठाण येथील महेशदादा क्रीडांगण येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एमडी बॉयज’ने याचे संयोजन केले आहे. एक ते चार क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाला आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिनाभर विविध कार्यक्रमांची मेजवानी शहरवासीयांना मिळणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून भव्य नाईट हाफपिच क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. २० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता कामगार नेते सचिन लांडगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. ८ खेळाडुंचा संघ असणार आहे. तर सहा षटकांचा सामना असणार आहे. प्रथम येणाऱ्या संघाला ५१ हजाराचे, द्वितीय संघाला ४१ हजारांचे, तिसऱ्या क्रमांकाला ३१ हजार तर चौथ्या क्रमांकाला २१ हजारांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. मॅन ऑफ द सिरिजला १० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
हेही वाचा – छगन भुजबळांच्या ‘त्या’ टीकेला रोहित पवारांचं उत्तर; म्हणाले..
उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस…
या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. या मध्ये सलग चार चौकार, उत्कृष्ट यष्टीरक्षक, सलग तीन विकेट, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षषण, शिस्तबद्ध संघ, सलग चार षटकाराची खेळी करणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात येणार आहे.
महेश मरे, दिनेश पठारे, अक्षय बा. लांडगे, मयुर गवस, संकेत होले, मकरंद गव्हाणे, विनोद होसमणी, ओंकार गवारे, राजवीर गणेश लांडगे यांनी यासाठी सहकार्य केले आहे.