breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत पतंगाच्या मांजाने चिरला पोलीस अधिकाऱ्याचा गळा

मुंबई – पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने पोलीस अधिकाऱ्याचा गळा चिरल्याची घटना मुंबईत घडली आहे. पोलीस अधिकारी दुचाकीवरून जात असताना ही धक्कादायक घटना घडली. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. राकेश गवळी असे त्यांचे नाव आहे.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,92,683 वर

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. ते जे. जे. मार्ग जंक्शनवर आले असताना अचानक नायलॉनचा मांजा त्यांच्या गळ्याजववळ आला, परंतु दुचाकीवर नियंत्रण मिळवताना त्यांचा गळा मांजाने चिरला आणि गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर जवळच ड्युटीवर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने तात्काळ गवळी यांना जे. जे. रुग्णालयात नेले. नंतर या घटनेबाबत समजताच पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी गवळी यांना तातडीने पुढील उपचारासाठी व्होकार्ट रुग्णालयात हलविले. तिथे त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गळ्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना दहा टाके पडले मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button