breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

पुनावळे कचरा डेपोविरोधी आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा

प्रशासन कुणाचे हित जोपासतेय : शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी उपस्थित केला सवाल

पिंपरी: शहराचा विकास करणे ही प्रशासनाची जबाबदारी असते पण सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने पुनावळेत कचरा डेपो उभा करून नक्की कोणाचे हीत जोपासले जातेय? असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केला. तसेच, सोसायटीधारक आणि भूमिपुत्रांनी काढलेल्या दुचाकी रॅलीत सहभागी होत प्रस्तावित कचरा डेपोविरोधी आंदोलना पाठिंबा दिला.

शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले की, एकीकडे पिंपरी चिंचवड शहराला अर्बन इनोव्हेशन प्रकारात जगातील १५ शहरांमध्ये जागतिक नामांकन मिळाले आहे ही निश्चित अभिमानाची बाब आहे. लोकनेते पवार साहेबांनी आपल्या विकासाच्या दूरदृष्टीतून संत तुकाराम महाराज साखर कारखान्याची जागा स्थलांतरित करुन जागतिक दर्जाचे हिंजवडी आयटी पार्क उभे केले. आज या आयटी पार्क मधून देशभरात लाखो रोजगार निर्माण झाले आणि मोठ्या प्रमाणात सरकारला महसूल देखील मिळत आहे असे असतांना दुर्दैवाने हिंजवडी आयटी पार्क जवळील पूनावळे येथे कचरा डेपोच्या माध्यमातून महानगरपालिका या परिसराचे असलेले औद्योगिक महत्त्व आणि पूनावळे सह मारुंजी, ताथवडे,वाकड, हिंजवडी आदि भागातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा घाट घालत आहे.

हिंजवडी आयटी पार्क जवळ असल्याने पूनावळे सह आसपासच्या भागात अनेकांनी कष्टाने फ्लॅट घेतले. व्यावसायिकांनी या भागात गुंतवणुकी केल्या आणि आता जर इथे कचरा डेपो सुरु झाला तर या भागाचे आता असलेले महत्त्व, इथला रोजगार कमी होणार आहे. शहराचा विकास करणे ही प्रशासनाची जबाबदारी असते पण सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने इथे कचरा डेपो उभा करून नक्की कोणाचे हीत जोपासले जातेय हा मला प्रश्न पडला आहे.

आज या परिसरातील संवेदनशील नागरिकांनी प्रस्तावित कचरा डेपोच्या निषेधात उत्स्फूर्तपणे आयोजित केलेल्या बाईक रॅलीस उपस्थित राहून महानगरपालिका प्रशासनाच्या बिंनडोक कारभाराचा तीव्र निषेध केला.

पुनावळे व आसपासच्या भागात मोठ्या संख्येने नागरीकरण होत असताना आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन हा प्रस्तावित कचरा डेपो जोवर इतर ठिकाणी हटवला जात नाही तोवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विषय लावून धरणार असल्याचा विश्वासही तुषार कामठे यांनी उपस्थित नागरिकांना दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, प्रशांत सपकाळ आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button