breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘सुधीरभाऊ, तुम्ही देवेंद्रजींपेक्षा सीनियर होतात पण मुख्यमंत्री ते झाले’, अनिल देशमुखांचा टोला

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशन हे भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे चांगलेच गाजले. अधिवेशनादरम्यान अनेक मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनाचा शेवटचा दिवस शेरो-शायरीमुळे देखील गाजला.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थेट अजित पवारांना सोबत येण्याचे आवाहन केले. मुनगंटीवारांनी तीन महिन्यात पुन्हा भाजप सरकार येईल, असाच इशारा एकप्रकारे शायरीमधून दिला. ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तीन महिने की दूरी है, फिरसे हमारा दौर आयेगा’ अशी शायरी करत मुनगंटीवार यांनी सूचक इशारा दिला आहे.

वाचा :-‘वाझेंना दुसऱ्या वकिलाची गरज नाही, मुख्यमंत्री ठाकरेच त्यांचे वकील’, फडणवीसांची बोचरी टीका

‘अनिल देशमुख यांचं वक्तव्य दुर्देवी होतं. ठाकरे सरकारला ठार करे सरकार करायचं आहे का? काही पक्षांचे चीन वर प्रेम आहे काही जणांचे सचिनवर प्रेम आहे. हे सरकार शरम प्रुफ आहे. आरोपींना वाचवण्यासाठी विदर्भातल्या माणसाला गृहमंत्रिपद दिले, असा टोलाही मुनगंटीवार यांनी देशमुखांना लगावला. अनिल देशमुखांनी देखील मुनगंटीवारांच्या या टीकेला शायरीतूनच जोरदार प्रत्युत्तर दिले.

मुनगंटीवार यांनी सगळ्या मंत्र्यांची नावं घेतली. पण तुम्ही देवेंद्रजींपेक्षा सीनियर होतात पण मुख्यमंत्री ते झाले. तुमच्या मनातलं दुःख मला कळत होतं. तुम्ही खोटं हसून ते सांभाळत होतात, असा खोचक टोला अनिल देशमुखांनी यावेळी लगावला.

तुमचं दुःख पाहून मला जगजितसिंह यांची गझल आठवतेय. सुधीरभाऊ तुम इतना क्यू मुस्करा रहे हो ? क्या गम है जो छुपा रहे हो…आखो में नमी, हसी लबो पें मतलब झुटीं हसी लबो पें ! क्या हाल हे, क्या दिखा रहो हो, असे उत्तर देशमुखांनी शायरीतून दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button