breaking-newsपिंपरी / चिंचवड

स्विगी आणि झोमॅटोची होम डिलिव्हरी सेवा तात्पुरती बंद करा – हेमंत डांगे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेलचालकांनी ग्राहकांच्या फोनद्वारे ऑर्डेर स्वीकारून होम डिलिव्हरीच्या माध्यमातून घरपोच पार्सल सुरु केली आहे. ग्राहकांना हॉटेलमधून घरपोच ओर्डर नेऊन देणाऱ्या स्विगी आणि झोमॅटो या संस्थेद्वारे ही सेवा दिली जात आहे. या संस्थेने डिलिव्हरी बॉयची कोरोनाची तपासणी केली आहे का नाही. याची कशी खात्री करायची.

महापालिकेने जनतेच्या सोयीसाठी हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी दिली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही कोरोनासंदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे. स्विगी आणि झोमॅटोच्या होम डिलिव्हरी बॉयची कोरोना तपासणी गरजेची आहे. अन्यथा शहरात आणखी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यावर उपाय म्हणून या दोन्ही संस्थांची होम डिलिव्हरी ची सेवा तात्पुरती बंद करावी.

शहरातील खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे आजारी नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून ओपीडीसाठी फिरता दवाखाना सुरु करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर मनसे, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button